शुभलाभ फायनान्स कंपनीच्या माध्यमातून होत आहे सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक : कमलेश धोटे, गजानन सातव, आशिष सायंकारपासून सतर्क राहा
किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्ह्यातील गरिबांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांची फायनान्स लोनच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक करत असलेल्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे, कारण हिंगणघाटमधील शुभलाभ फायनान्स कंपनीच्या माध्यमातून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होतं असल्याचे पुरावे RNN हाती आले आहेत. परिणामी कमलेश धोटे, गजानन सातव, आशिष सायंकार यांच्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे लागणार आहे.
जिल्ह्यात मागील २ वर्षांपासून फायनान्स लोनच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी फायनान्स कंपन्यांनी उच्छाद मांडला आहे. कमलेश धोटे आणि गजानन सातव यांनी वर्धा शहरात जी. एस. फायनान्स कंपनी टाकून सुमारे 200 नागरिकांना कोट्यावधीचा चुना लावला. आता हाच कमलेश आणि गजानन हिंगणघाट येथील आशिष सायंकार याला हाताशी धरून शुभलाभ फायनान्स कंपनी टाकून जनतेला लुटत आहेत.
सामान्य नागरिकांच्या गरजेच्या फायदा घेऊन त्यांना कर्जपुरवठा करून देतो, यासाठी कमिशनच्या माध्यमातून आम्हाला काही पैसे द्यावे लागतील. अश्या बतावण्या करून सामान्य नागरिकांना भुरळ पाडून त्यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो.
राष्ट्रीयीकृत बँकेकडे सामान्य नागरिकांनी जर कर्ज पुरवठ्यासाठी अर्ज केला, तर तो काही कागदपत्रांच्या कमतरतेमुळे रद्द करून सामान्य नागरिकांना कर्ज पुरवठा करण्यास राष्ट्रीयीकृत बँका हरकत घेतात.
परंतु फायनान्स कंपन्यांना ते खोट्या शासकीय कागदपत्रांच्या आधारावर लाखो रुपयांचे कर्ज सहज उपलब्ध करून देतात. हे धागेदोरे राष्ट्रीयीकृत बँकेच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले, असून याची चौकशी करणे गरजेचे आहे.
कमलेश धोटे, गजानन सातव यांचीच एक शाखा शुभलाभ फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हिंगणघाट क्षेत्रात कार्यरत आहे. या शुभलाभ फायनान्स कंपनीचा मोरक्या आशिष सायंकार असून तो सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करून लाखो-करोडोच्या संपत्तीचा मालक झाला आहे.
शुभलाभ फायनान्स कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांचे खोटे शासकीय नौकरीचे दस्तावेज तयार करून राष्ट्रीयकृत बॅंकेच्या बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो.
ग्राहकांना मिळालेल्या कर्जपुरवठ्यातुन कमिशनच्या माध्यमातून लाखो रुपये उकळले जातात. परंतु ग्राहकांना उपलब्ध झालेल्या कर्ज पुरवठ्याची पूर्ण रक्कम ग्राहकांना मासिक हप्त्यात परत करावे लागते. यातच सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या जाते. यावर कुठे तरी रोख लावून या शुभलाभ फायनान्स कंपनीची चौकशी करून यांचा मोरक्या आशिष सायंकार, कमलेश धोटे व गजानन सातव यांच्यावर कारवाई करून यांना गजाआड करणे गरजेचे आहे.