रंगाविना धुलीवंदन अन् राष्ट्रसंताच्या विचारांची उधळण..! सुरगांवात धुळवड न खेळण्याची २७ वर्षापासूनची परंपरा
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या सुरगांव येथे गेल्या २७ वर्षापासून समाज प्रबोधनकार तथा सप्तखंजिरी वादक प्रवीण महाराज देशमुख यांच्या पुढाकाराने रंगाविना धुलीवंदनाची अनोखी परंपरा कायम ठेवत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वधर्मसमभावाचा तीन दिवस जागर करण्यात आला. याप्रसंगी प्रबोधनपर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्यक्रमाचा धुळवडीच्या दिवशी गावातून संपूर्ण गावकरी व विविध जिल्ह्यातून आलेल्या गुरुदेव प्रेमींच्या उपस्थितीत निघालेल्या संदेश प्रभातफेरी नंतर मान्यवरांच्या प्रबोधनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील ग्रामस्थांनी संपूर्ण गावातील रस्ते आरशासारखे स्वच्छ करून सडामार्जन करीत रांगोळीच्या माध्यमातून सजविले. प्रत्येक घरासमोर संतांच्या प्रतिमा सजविलेल्या आसनावर विराजमान होत्या. आकर्षक प्रवेशद्वार, कमानी , स्वागत फलक व गावातील सर्व घरांच्या भिंती राष्ट्रसंतांच्या विचाराने जणू काही बोलक्या झाल्या होत्या. भल्या सकाळी निघालेली नामधून राष्ट्रसंतांच्या विचाराचा गजर करीत संपूर्ण गावातून फिरून आल्यावर भव्य अशा उभारलेल्या सभामंडपात “सत्संग पर्व” पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्त खंजिरीवादक प्रबोधनकार इंजिनियर भाऊसाहेब थूटे होते. यावेळी विचारपिठावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, समाजसेवक मोहन अग्रवाल, प्रा. मोहन गुजरकर, अनिल नरेडी, नितेश कराळे, सुनील बुरांडे, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, भास्करराव वाळके, बा. दे. हांडे, सुरेश नागपुरे, योगशिक्षक बाबाराव भोयर, प्रकाश कदम, किशोर करंदे, महाकाळकर गुरुजी, संजय इंगळे तिगांवकर, गंगाताई काकडे, शेख मेहबूबभाई, नरेश गावंडे, वेणूताई हांडे, नंदकुमार शेळके, सुरेश वानखेडे, प्रदीप वानखेडे, संदीप चिचाटे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. अनेक मान्यवरांनी याप्रसंगी यथोचित मार्गदर्शन देखील केले.
या कार्यक्रमाचे संचालन रूपाली रुपेश झाडे यांनी तर आभार समीक्षा नेहारे यांनी मानले. सामूहिक भोजनानंतर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा सप्त खंजिरीवादक प्रवीण महाराज देशमुख यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाने रात्री कार्यक्रमाचा शेवट झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वैभव मेहता, संकेत, शुभम रवींद्र किनगांवकर, हरिभाऊ पाटील, विनोद मेश्राम, धिरज चौधरी, संकेत नेहारे, वैभव धाबर्डे, शैलेश सुधाकर आडे, विजय, उमेश, श्रावण, चेतन मखरे, मंगेश गजानन ठाकरे, क्षितीज चनेकार, आशिष, वृषभ तराळे, स्वपनिल हांडे, शाम, शुभम उईके, गणेश शिरपूरक, प्रमोद, प्रणय, निखील व गजानन येंगडे, भाग्यश्री, वैष्णवी नेहारे, सहारे आदिंनी सहकार्य केले.