Breaking
ब्रेकिंग

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी

1 9 7 0 6 8

सचिन धानकुटे

सेलू : – अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कोटंबा फाट्याजवळ घडली. प्रकाश गुलाबराव कोवार(वय४०) रा. आमगांव(मदनी) असे सदर अपघातातील मृतकाचे तर रंगदेव मरसकोल्हे(वय५०) रा. बोरखेडी, ता. आर्वी असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि रंगदेव हे दोघेही आज एम एच ३१ बीबी ५९३९ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर जिल्ह्यातील वडगांव(बक्षी) येथे रंगदेवची शेती मक्त्याने देण्यासाठी गेले होते. दरम्यान काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी निघाले असता कोटंबा फाट्याजवळ सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. सदर अपघातात प्रकाशच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर रंगदेव गंभीर जखमी झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी रंगदेवला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत प्रकाशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी राजेंद्र कोवार यांच्या तक्रारीहून पोलिसांनी अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे