ब्रेकिंग
आजारपणाला कंटाळून इसमाची आत्महत्या
2
6
6
6
6
0
सचिन धानकुटे
सेलू : – आजारपणाला कंटाळून इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नजिकच्या रेहकी येथे काल गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. भाऊराव जानबाजी रघाटाटे (वय ६९) रा. रेहकी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून मृतक भाऊराव रघाटाटे हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्या आजारपणातील वेदना असह्य झाल्याने अखेर त्यांनी काल सकाळी अकरा वाजता आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी पंचनामा करीत नोंद घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी व स्नुषा असा आप्तपरिवार आहे.
2
6
6
6
6
0