मसाळ्याच्या मनिषनगरात हायप्रोफाइल जुगारअड्डा : हजारोंच्या रोकडसह लाखोंचा माल जप्त : सेवाग्राम पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
किशोर कारंजेकर
वर्धा : मसाळ्याच्या मनिषनगरात सुरु असलेल्या हायप्रोफाइल जुगारअड्ड्यावर छापा टाकून हजारोंच्या रोकडसह लाखोंचा माल जप्त करण्यात आला. सेवाग्राम पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. गुरुवारी रात्री 1 वाजता ही कारवाई करण्यात आली.
स्वप्निल रमेश लेवडीवार (वय 35) रा. वार्ड क्र. 10 धंतोली, वर्धा आरोपी 2 ) प्रशांत दादाराव वंजारी (वय 48) रा. वंजारी चौक वार्ड क्र. 16 वर्धा 3) मंगेश महादेव चावरे (वय 33) रा. सावली सास्ताबाद ता. हिंगणघाट जि. वर्धा 4) मोहन देविदास भोंगाडे (वय 46 वर्ष) रा. मदनी (दिंदोडा) ता. जि. वर्धा 5) संतोष ज्ञानेश्वर वाघमारे (वय 44 वर्ष) रा. करंजी 6) स्वप्निल गुलाबराव लाड (वय 36 वर्ष) रा. कुनघटकर ले आउट सिंदीमधे वर्धा रा. मदनी (दिंदोडा) वर्धा, 7) सुरेश ऋषीलाल चामट (वय 38 वर् रा. गिताईनगर व्हीआयपीरोड, वर्धा अशी जुगार खेळणाऱ्या जुगारिंची नावे आहेत.
मसाळा येथील मनिषनगरात मोठ्याप्रमाणात जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून हा छापा टाकण्यात आला.
मिळालेला माल :-1) आरोपी क्र -(1) चे ताब्यातून 18500 रू एक जुना वापरता सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रूपये व अँक्टीवा मोपेड गाडी क्र. MH 32 AA 0268 किं. 70,000/- रूपये
2) आरोपी क्र:-2 चे ताब्यात 2400/- रूपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल किं. 10,000/- रूपये,
3) आरोपी क्र 3 चे ताब्यात नगदी 220/- रूपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रूपयेहोंडा युनिकॉन मोटरसायकल क्र. MH 32 AP 8667 किंमत 50,000
क्र. 4) आरोपी क्र नगदी 300/- रूपये व विवो कंपनीचा मोबाईल कि. 10,000/- रूपये व स्प्लेंडर मोटरसायकल MH 32 AV 0945 किंमत 80,000/-, 5) आरोपी क्र 5 याचे ताब्यातून याचे ताब्यातुन नगदी 15,500/- रूपये व ओपो कंपनीचा मोबाईल किं. 10,000/- रूपये 6 ) आरोपी क्र 6 यांचे ताब्यातून 1000/रूपये ओपो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रूपये, व अँसेस कंपनीची मोपेड ज्यावर नंबर प्लेट नसुन चेचिस क्र. MB8DP11ACK8C32727 किंमत 50,000/- रूपये 7) आरोपी क्र 7 यांच्या ताब्यातुन नगदी 2000/- रूपये व वनप्लस कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/ व सुझुकी बर्गमॅन स्ट्रिट मोपेड गाडी क्र. MH 32 AQ 5854 किंमत 80,000/- रूपये, 8) रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी क्र. MH 32 AA 7337 किंमत 1,20,000/- 9) व 52 तास पत्ते किंमत 50/- रूपये असा एकुण 5,59,970 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे, sdpo प्रमोद मकेस्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, Psi शिवराज कदम, Asi संजय लोहकरे, Hc मिलिंद राजपूत, Hc विकास लोहकरे, Npc संजय लाडे, Hc संदीप मेंढे यांनी केली आहे.