दाम्पत्याची इसमाच्या डोळ्यात तिखट फेकत सळाखीने
सचिन धानकुटे
सेलू : – डोळ्यात मीर्ची पावडर फेकून इसमाला लोखंडी सळाखीने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये शुक्रवारी घडली. याप्रकरणी सावरकर नामक दाम्पत्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद खाँ मेहबूब खाँ पठाण हे प्रभाग क्रमांक पाचमध्ये राहत असून शुक्रवारी ते आपल्या कामावर जात होते. दरम्यान ते सावरकर यांच्या घरासमोरुन जात असताना संदीप सावरकर हे त्यांच्या घरासमोर उभे होते. यावेळी जावेद पठाण यांनी संदीपला तू मला रात्री शिवीगाळ केली व पोलीस ठाण्यात तक्रार का दिली असे म्हणताच संदीपने तू जास्त माजला काय असे म्हणत घरातून मिरची पावडर आणून जावेद यांच्या डोळ्यात फेकले. त्यानंतर घरातून लोखंडी सळाख आणून त्यांच्या डोक्यावर मारल्याने ते गंभीर जखमी झाले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संदीप यांच्या पत्नीने सुद्धा सळाखीने पाठीवर मारहाण केली. यासंदर्भात जावेद यांच्या तक्रारीहून सेलू पोलिसांत सावरकर दाम्पत्या विरोधात भांदवि कलम ३२६,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.