धक्कादायक… आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याकडून विद्यार्थीनींचा विनयभंग ; देवळी पोलिसांत तक्रार दाखल
किशोर कारंजेकर
वर्धा : – आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थींनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेत घडली. आश्रमशाळेतील मुलींचा वारंवार विनयभंग होत असल्याबाबतचा धक्कादायक प्रकार दस्तुरखुद्द शाळेतीलच महिला अधिक्षकांनी उजेडात आणला. यासंदर्भात देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या अधिक चौकशी करीत आहेत.
देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील पुरुष स्वयंपाकी हा पाचव्या वर्गातील मुलींसोबत अश्लिल चाळे करीत असून वाह्यात शब्दात मुलींशी बोलत असल्याने तेथील संपूर्ण मुली भयग्रस्त झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्यावर ओढावलेला हा भयावह प्रसंग रडत-रडत शाळेतील अधिक्षकांकडे कथन केला. सदर कर्मचाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी तसेच या अबोध विद्यार्थींनींना संरक्षण मिळावे, अशी मागणी अधिक्षीकेने देवळी पाेलीसांकडे तक्रारवजा निवेदनाद्वारे केली. या तक्रारीवर सध्या चौकशी सुरू आहे.
सदर वादग्रस्त आश्रमशाळा ही एका आमदाराच्या गळ्यातील ताईत असलेल्या एका पिलांटूची असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सदर प्रकरण दडपले तर जाणार नाही ना.. अशी शंका तालुक्यात उपस्थित होत आहेत.
तर दुसरीकडे भाजप नेते मंडळी कोणती भूमिका वाठावतील हेच पाहणे औचित्याचे ठरणार आहे.