ब्रेकिंग
दुकानातील नोकरचं निघाला चोर..! गोडाऊनच्या आतील एलईडी टिव्हीची परस्पर विक्री

1
2
7
1
1
5
सचिन धानकुटे
सेलू : – एलईडी टिव्ही परस्पर गहाळ करीत विकणारा दुसरा-तीसरा कोणीही नसून दुकानातील नोकरचं असल्याचे लक्षात येताच मालकाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. सदर तक्रारीहून सिंदी पोलीस ठाण्यात नोकरा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सिंदी(रेल्वे) येथे मिलिंद दामोधर बेलखोडे यांच्या मालकीचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात येथीलच गुलशन गुलाब देवतळे हा नोकर म्हणून काम करतो. त्याने ता. २६ ते ३० एप्रिलच्या दरम्यान दुकानाच्या गोडाऊनची बनावटी चाबी तयार करीत चक्क गोडाऊनमधील सहा एलईडी टिव्ही संच परस्पर बाहेर विकले. ही बाब जेव्हा दुकान मालक बेलखोडे यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी नोकर गुलशन विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सिंदी पोलीस करीत आहे.
1
2
7
1
1
5