Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात `फिटर`ला टेंडरक्लर्क करून गैरकारभाराचे `फिक्सिंग` : जिल्हा परिषद CEO घुगे यांची मूक संमती : चढत्या श्रेणीच्या दुर्गुणांची कागदपत्रे होताहेत उघड

1 9 7 0 8 8

किशोर कारंजेकर

वर्धा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील गैरप्रकाराचे एकापेक्षा एक चढत्या श्रेणीच्या दुर्गुणाचे किस्से बाहेर यायला लागले आहेत. अत्यंत निगरगट्टपणे आपले काहीच बिघडत नाही, असे समजून किंबहुना वरिष्ठांना खिशात घातल्याचाही काही जणांजवळ निर्वाळा देत पाहिजे तसेच गैरप्रकाराचे इमले बांधकाम विभागात बांधले जात आहेत. त्यात टेंडरक्लर्कचा पदभार चक्क `फिटर प्लंबर` पदावर काम करणार्‍या `जगदीश`वर सोपवून एचओडीने इप्सित साधण्याच्या `दिशा` मोकळ्या केल्या आहेत.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कंत्राटदारांच्या नजरेतही पडणार नाही, अशा पद्धतीने या कारकून नसलेल्या `फिटर प्लंबर`कडून कामाचे कंत्राट स्वत:कडेच ठेवण्याचे फिटिंग आणि फिक्सिंग साहेबांसह काही त्यांचे निकटस्थ क.अभियंते करून घ्यायला लागले आहेत. कर्मचार्‍यांची कमतरता नसताना `फिटर प्लंबर` पदावर काम करणार्‍या जगदीशला उपविभागातून बोलावून घेत चक्क टेंडर क्लर्कच्या खुर्चीत बसविण्याचा सूत्रधार असलेल्या एचओडी साहेबास संरक्षण देणार की त्यांच्या स्वैर कारभारांना आवर घालणार, हाच खरा प्रश्न आहे.

फिटर प्लंबरचे काम नळाच्या तोट्या दुरुस्त करण्याचे आहे. पण तो एका `वन`स्करीच्या मर्जीत आहे. हा वनस्करी एचओडीच्या मर्जीत असल्याने फिटर प्लंबर पान्हे पेनचीसद्वारे नळाच्या तोट्या दुरुस्त करायचे काम सोडून उपविभागात न बसता विभागीय कार्यालयातल्या टेंडर क्लर्कच्या खुर्चीत बसून साहेबांच्या कंत्राटदारीतील नळातल्या पैशाच्या पाण्याची धार वाहती ठेवण्याची जबाबदारी सांभाळतो.
एका कनिष्ठ अभियंत्याने मोजणी पुस्तकातील पानातील तारखेचे भान विसरून केलेल्या नोंंदी तर भन्नाटच आहे.
कारंजा येथील उपविभागातून बदली झाल्यानंतर मलमपट्टीकराने मोजणी पुस्तकात केलेल्या नोंदीवर एचओडी असताना कामाच्या नोंदीची तपासणी उपविभागीय अधिकारी म्हणून तब्बल एक महिन्यानंतर केल्याची नोंद कोणत्या तांत्रिक ज्ञानात बसते, याची खमंग चर्चा आहे. सध्या तीन मोजणीपुस्तकांच्या झेरॉक्स हाती आल्या असून त्यातील काही पाने निधी हडप कारभाराचे पुरावे आहेत.

कार्यकारी अभियंता विवेक पेंदे यांच्या सर्व भ्रष्टाचाराकडे ZP CEO घुगे यांची ‘अर्थ’पूर्ण संमती असल्याची माहिती नाव न प्रकाशित करण्याच्या सूत्रांनी दिली असून, आदरणीय पेंदे यांनी मसाळा येथील लेआऊटमधील किती भूखंड बुक केले, त्याकरिता किती रक्कम दिली, याबाबत पुढील भागात आम्ही देणार आहो.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे