Breaking
ब्रेकिंग

घोराड येथे आज प्रकाश महाराज चंदनखेडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

1 9 7 0 7 2

सचिन धानकुटे

सेलू : – घोराड येथे संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आज शुक्रवारी हभप प्रकाश महाराज चंदनखेडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथील श्री संत केजाजी महाराज दिंडी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

      घोराड येथे श्री संत केजाजी महाराज यांचा ११७ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याकरिता स्थानिक विठ्ठल रुख्मिनी देवस्थान समिती, जगदंबा मंदिर ट्रस्ट, शनी मंदिर ट्रस्ट, श्री संत केजाजी महाराज सेवा मंडळ तथा ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज शुक्रवारी सायंकाळी ७ ते १० यावेळेस संत नामदेव महाराज मंदिराच्या समोरील परिसरात हभप प्रकाश महाराज चंदनखेडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संत केजाजी महाराज दिंडी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर व आळंदी येथील ज्ञानराज कृपा प्रासादिक संस्थेचे सचिव तथा पुंडलिकवरदा आध्यात्मिक ट्रस्टचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज चंदनखेडे आपल्या सुश्राव्य वाणीतील कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध करणार असल्याने भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संत केजाजी महाराज दिंडी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे