दीपचंदचे डी. पी. झाडे विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित
सचिन धानकुटे
सेलू : – येथील दीपचंद चौधरी विद्यालयाचे शिक्षक डी पी झाडे सर यांना नुकतेच विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील विद्याभूषण फाऊंडेशनने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पूरस्कार बहाल केला.
शैक्षणिक व सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या नागपूर येथील विद्याभूषण फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विदर्भ भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डॉ सिद्धार्थ गायकवाड, वर्ल्ड बँकेचे डॉ रमेश ठाकरे, अँडिशनल कमिशनर ट्रायबल डॉ रवींद्र ठाकरे, ब्रिगेडियर सुधिर सावंत, महाराष्ट्र शासनाच्या डेप्युटी कमिशनर संघमित्रा ढोके, विद्याभूषण फाऊंडेशनचे संचालक डॉ भूषण भस्मे, पूजा भस्मे, डॉ अनिल शर्मा, प्रोफेसर प्रतापसिंह चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपचंद चौधरी विद्यालयाचे शिक्षक तथा रेहकी येथील सुपूत्र डी पी झाडे सर यांना विदर्भ भूषण-२०२३ पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूरच्या डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवनात शनिवारी सदर सोहळा पार पडला.