Breaking
ब्रेकिंग

संतापजनक…! शवविच्छेदनासाठीही मोजावे लागतात पैसे ; समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कारवाईसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन

2 2 5 2 6 2

किशोर कारंजेकर 

समुद्रपूर : – येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी देखील नातलगांना पैसे मोजावे लागत असल्याचा अत्यंत संतापजनक असा प्रकार नुकताच उजेडात आला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संबधितांवर कारवाईसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

  तालुक्यातील सावंगी (मिर्झापूरे) येथील तरुण शेतकऱ्याचा काल बुधवारला सर्पदंशामुळे मृत्यू झाला. रमेश भगवान बहादूरे (वय२१) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यासाठी हिंगणघाट येथून कर्मचारी बोलवावा लागतो आणि त्यासाठी दोन हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. याकरिता मृतकाच्या भावाकडून दोन हजार रुपये घेण्यात देखील आले. सदर प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यापुढे असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील दिला. यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सौरभ साळवे, मधू कामडी, रणजित चावरे, अमित लाजूरकर, योगेश क्षिरसागर, अनिकेत अवचट, अतुल टेकाडे, अतुल चौधरी, विवेक घुमडे, ऋषिकेश डगवार, प्रज्वल आकडे, नंदू गिरीले, राम गाठे, अभिषेक आंबटकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 2 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे