आयुष्यात मेहनती शिवाय पर्याय नाही – डॉ अभ्युदय मेघे : दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सचिन धानकुटे
सेलू : – दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीने नुकताच दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ स्थानिक संताजी सभागृहात पार पडला. याप्रसंगी तालुक्यातील १४० पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह आणि स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अभ्युदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, प्रमुख अतिथी म्हणून सचिन जगताप शिक्षणाधिकारी, सुहासिनी पोहाणे प्राचार्य दिपचंद चौधरी विद्यालय, विनोद लाखे माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेश डोंगरे प्राचार्य स्कूल ऑफ ब्रिलीयंट, सतीश काटवे प्राचार्य गुड शेफर्ड कॉन्व्हेंट, डॉ. अजय पेठे विभाग प्रमुख ॲडमिशन सेल दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, डॉ अनिल पेठे प्राचार्य दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ अभ्युदय मेघे म्हणाले, जीवनात आपल्याला काय करायचं आहे, हे पहिले ठरवा, जर हे तुम्ही ठरवलं तर मग पुढे आयुष्यात सर्व मार्ग आपोआपच मोकळे होतात. वयाचा १६ ते २६ हाच टप्पा आयुष्याला कलाटणी देणारा असतो,आपण आपल्या भविष्याचा विचार याच वर्षात करावां लागतो.
यावेळी मंचावरून बोलताना शिक्षणाधिकारी जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचे उमेदीचे वय वाया न घालवता त्याचा योग्य वापर करून आयुष्यात आपले काही ध्येय निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यात आपलं ध्येय हे ठरवलचं पाहिजे.
या कार्यक्रमाचे संचालन संतोष डाखोळे यांनी तर प्रास्ताविक मोहित सहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशांत वानखेडे, हरीश पारीसे, मंगेश वानखेडे, गौरव तळवेकर, प्रवीण ढोकणे, शुभम लुंगे, निलेश ठाकरे, पंकज वानखेडे, भावेश ठाकूर, अक्षय वासे, सतीश नाईक, संदेश धूर्वे, त्रिशूल पाटील, नितीन चामलाटे आदिंचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.