Breaking
ब्रेकिंग

आश्चर्यकारक..! लायसन्स एकाचे अन् चालवतो भलताच, फार्मासिस्ट नसणाऱ्या मेडीकलचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

1 9 7 0 8 5

सचिन धानकुटे

सेलू : – मेडीकल स्टोअर चालविण्यासाठी फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. परंतु खेड्यापाड्यात नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याचा सर्रास खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र आहे. फार्मासिस्ट नसतानाही मेडीकल स्टोअर चालवून रुग्णांच्या जिवीताशी खेळ खेळणाऱ्या अशा प्रकारच्या मेडीकल चालकांवर आता कारवाईची मागणी होत आहे.

       मेडीकल स्टोअरसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. यात मेडीकलमध्ये पूर्णवेळ रजिस्टर फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. यासोबतच फार्मासिस्ट नसलेल्या व्यक्तीला औषधांची विक्री करता येत नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देता येत नाहीत. औषधांच्या दुकानात कॉम्प्युटर, प्रिंटर, फ्रीज आणि सीसीटीव्ही बंधनकारक आहे. याशिवायही अनेक नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही ह्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. परंतु ते केवळ वसूली करण्यातच धन्यता मानतात. प्रत्यक्षात नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे कळायला मार्ग नाही.

      ग्रामीण भागात अनेक मेडीकल स्टोअरमध्ये रजिस्टर फार्मासिस्टच नाहीत. याठिकाणी कोणीही हवशागवशा येतो आणि औषधांची विक्री करतो. लायसन्स एकाचे अन् चालवतो भलताच असेही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी घडते. त्यामुळे अशा अनधिकृत औषध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे