Breaking
ब्रेकिंग

दीपचंदच्या खेळाडूंचा महाराष्ट्राच्या हॉकी संघात समावेश, ग्वाल्हेर येथील राष्ट्रीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व

राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर निवड

2 0 8 9 8 8

सचिन धानकुटे

सेलू : – येथील दीपचंद चौधरी विद्यालयातील खेळाडूंचा नुकताच महाराष्ट्राच्या शालेय हॉकी संघात समावेश करण्यात आला. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत शाळेचे तीन खेळाडू महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे(वंजारी) यांनी आज दिली. दीपचंदच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत केलेल्या दमदार आणि चमकदार कामगिरीच्या जोरावर हे घवघवीत यश प्राप्त केले.

   सांगली येथे नुकत्याच हॉकीच्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्यात. यात दीपचंदच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले तर मुलांच्या संघात देखील काही खेळाडूंना सहभागी होता आले. राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या दमदार आणि चमकदार कामगिरीच्या जोरावरच आता शाळेच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये प्राची मोरेश्वर कटरे आणि लावण्या बंडूजी बावणे या दोन मुलींचा तर गौरव मारोती धानकुटे ह्या मुलाचा समावेश आहे. शाळेचे तीनही खेळाडू विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. येत्या दिवसात ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी होणार आहे.

     राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी संघात देवयानी धानकुटे, आरोही येवले, मेघना साठोणे, नंदिनी लाडे, श्रुती डेकाटे, चैताली चहांदे, गोलरक्षक आरजू दमाये, रागिणी मांढरे, ऐश्वर्या परसखेडे, नव्या बिसेन, हर्षिता मांढरे, गुंजन वाघाडे, ज्ञानेश्वरी पोहाणे, नैतिक तिजारे, ओम अंभोरे आदि खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश होता. संघ व्यवस्थापक म्हणून शिक्षक संजय बारी यांचे तर शिक्षीका मिनाक्षी सोमनाथे व ज्योती उमाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन या खेळाडूंना मिळाले. तसेच प्रशिक्षक म्हणून सागर राऊत यांनी तर खेळाडूंचा सराव घेण्यासाठी चैतन्य कांबळे यांनी अहोरात्र प्रयत्न केले. 

     दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पोहाणे ह्या हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर शाळेला हॉकी खेळाच्या माध्यमातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. हॉकी हा देशाचा राष्ट्रीय खेळ असून सर्वसाधारणपणे यात शहरी भागातील खेळाडूंचेचं प्राबल्य होते. परंतु त्यांनी सेलू सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉकीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्याचेच द्योतक म्हणजे आज शाळेचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेच्या संघाला नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला. ही बाब उल्लेखनीय तसेच इतरांना प्रेरणादायी आहे.

    राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे(वंजारी), सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी सह पदाधिकाऱ्यांनी तसेच पर्यवेक्षक डॉ कल्पना मकरंदे, विजय चांदेकर, जी. बी. खंडागळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक मंगेश वडूरकर, एच. जे. मुडे, हेमंत घोडमारे, प्रशांत चव्हाण, यु. व्ही. पिंपळापूरे यांच्यासह शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत राष्ट्रीय पातळीवर शाळेसह गावाचा नावलौकिक करीत यशोशिखरावर पोहचण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील क्रिडा शिक्षकांना आणि वरिष्ठ खेळाडूंना दिले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे