वाहनासह साडेचार लाखांचा सुगंधित पान मसाला जप्त ; तीघांना अटक
सचिन धानकुटे
वर्धा : – पोलिसांनी दोन वाहनासह साडेचार लाख रुपयांचा सुगंधित पान मसाला जप्त करीत याप्रकरणी तीघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान शहरातील शिवाजी चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शहरातील शिवाजी चौकात नाकाबंदी दरम्यान गोंडप्लाट येथील दिनेश भिमराव जयस्वाल (वय३३) ह्याच्या मोपेडची पाहणी केली असता त्यात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला. सदर पान मसाला व तंबाखू दिनेशने संजय भाऊराव माकोडे (वय४४) रा. गोंडप्लाट व भुषण जिवनलाल राठी (वय २७) रा. बोरगांव (मेघे) ह्या दोघांकडून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सुगंधित पान मसाला व तंबाखू पोलिसांनी जप्त केला. वरील माल हा ज्याच्याकडून खरेदी करण्यात आला त्या अमरावती येथील श्याम लाहोटी ह्याच्यावर सुद्धा याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत वेगवेगळ्या कंपनीचा जवळपास १७५ किलो सुगंधित पान मसाला, जर्दा व तंबाखूसह दोन दुचाकी, तीन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६४ हजार ४२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व तीघांना अटक देखील करण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, अन्न व औषध सुरक्षा विभागाचे गेडाम, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, मनिष कांबळे,
प्रदीप वाघ, पवन पन्नासे, नितीन इटकरे, अखिल इंगळे आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.