Breaking
ब्रेकिंग

सेलू शहरातील रेहकी चौकाची सौंदर्यीकरणात आघाडी ; आमदारांच्या विकास निधीतून होणार कायापालट

2 7 3 7 5 4

सचिन धानकुटे

सेलू : – शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक ठरलेल्या रेहकी चौकाने सौंदर्यीकरणात नुकतीच आघाडी घेतली असून आमदार डॉ पंकज भोयर यांच्या स्थानिक विकास निधीतून सदर चौकाचा कायापालट होणार आहे.

शाळा, महाविद्यालय, दफ्तरी ऍग्रो कंपनी, मंगल कार्यालय, बसस्थानकासह वर्धा शहर तसेच येळाकेळीकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या अशा रेहकी चौकाचा लवकरच कायापालट होणार असून चौकाच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. याकरिता आमदार डॉ पंकज भोयर यांच्या स्थानिक विकास निधीतून तब्बल २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यात सदर चौकाच्या मध्यभागी पंधरा फुटाच्या गोलाकार वर्तुळासह सुशोभीकरण तसेच मध्यभागी एक विशिष्ट प्रतिकृती प्रस्तावित आहे. यासोबतच सदर निधीतून रेहकी रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात हायमास्ट तसेच हनुमान मंदिराजवळ गट्टू बसविण्याचे देखील नियोजित आहे.
सदर रेहकी चौक हा लोकसंख्येने लहान परंतु क्षेत्रफळाने मोठा असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक चौदामध्ये येतो. ह्या प्रभागात गेल्या वर्षभरात तब्बल सव्वा कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची कामे झाली तर काही प्रस्तावित असल्याची माहिती भाजपच्या गटनेत्या चंदा ओमदेव सावरकर यांनी दिली. ह्या प्रभागात आमदार रामदासजी आंबटकर यांच्या विकास निधीतून जवळपास ४७ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. यात पुलासाठी १९ लाख, ओपनस्पेसच्या सौंदर्यीकरणासाठी १४ लाख तर सिमेंट रस्त्यावर १४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. यासोबतच स्थानिक माता मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदर काम प्रस्तावित आहे. सिमेंट रस्ता व नालीसाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
शहरात ज्या ठिकाणी नाली बांधकाम न करताच निधी ढापण्यात आला होता, तेथील तुकाराम गरड ते बेदमोहता लॉनपर्यंत सिमेंट रस्ता तसेच प्रभागातील इतर नाली बांधकामासाठी १४.५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वर्षभरात जवळपास सव्वा कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा निधी आमदारांनी प्रभागासाठी दिल्याने गटनेत्या चंदा सावरकर तसेच भाजपचे शहराध्यक्ष ओमदेव सावरकर यांनी आमदार डॉ पंकज भोयर यांचे विशेष आभार देखील मानले. भविष्यात शहरातील प्रत्येक प्रभागातील महत्त्वाच्या कामांसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी भाजपचे शहराध्यक्ष ओमदेव सावरकर यांनी दिली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 7 3 7 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे