Breaking
ब्रेकिंग

वर्धा खरेदी विक्री संघावर प्रा. सुरेश देशमुख गटाचे वर्चस्व कायम, तेराही उमेदवार देशमुख गटाचे विजयी

2 5 4 4 4 4

किशोर कारंजेकर 

वर्धा : जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी खरेदी-विक्री संघाची संचालक पदाकरिता आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवडणूक घेण्यात आली, यावेळी सहकार नेते माजी आ. प्रा. सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात शरद देशमुख, जि. प. चे माजी अध्यक्ष शशांक घोडमारे, राष्ट्रवादीचे युवा नेते समीर देशमुख, यांनी १४ संचालक असलेल्या खरेदी विक्री संघाची निवडणूक लढली. यात देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजित कांबळे यांना केवळ तीन उमेदवार मिळाले असून सर्व उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. 

 

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवडणूक अधिकारी श्री. वाहने यांच्या अध्यक्षतेत खरेदी विक्री सहकारी संस्था वर्धाच्या संचालक पदाकरिता आज शनिवार सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संचालक पदाकरिता मतदान घेण्यात आले. यात सहकार क्षेत्राचे नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, बापूरावजी देशमुख फाउंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, जि. प. चे माजी अध्यक्ष शशांक घोडमारे आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे युवा नेते समीर देशमुख यांच्या मार्गदर्शनात वैयक्तिक मतदार संघातून पंकज रमेशराव घोडमारे (वायफड) सुरेश खंडागळे (पालोती), इतर मागास प्रवर्गातून संदीप माणिकराव राऊत (पुजई), अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून भाऊरावजी मगर (सोनेगाव स्टे.) महिला प्रवर्गातून पुष्पा ज्योतीबा येंगडे, स्वाती राजेंद्र लांबट (वडद), सर्व सहा उमेदवार अविरोध निवडून आले, तर सोसायटी मतदार संघातून अनिल रामराव ठाकरे (वायफड) (२८मते), संकेत अशोकराव निस्ताने (सिरसगाव) (२८मते), संदीप शेषराव भांडवलकर (पवनार), सर्वाधिक (३३ मते), रमेश भाऊरावजी गायकवाड, पिपरी (मेघे) (२९ मते), सूरज माधवराव गोहो (महाबळा) (३० मते), संतोष किसनाजी बोरकुटे (आमला) (२८ मते), प्रकाश विठठलराव खेकडे (कुटकी) (२२मते), रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनात रुपराव लक्ष्मणराव मोरे आंजी (मोठी )(१८ मते), निशिकांत आनंदराव मेघे, बोरगाव (मेघे) (२१ मते), श्रीकांत विनायक वडतकर (वडद) (१७ मते) यांना पराभव पत्कारावा लागला, तर १४ वा संचालक एन. टी. प्रवर्गातून न मिळाल्याने संचालक पद रिक्त राहले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाकरिता संपन्न झालेल्या निवडणुकीत आमदार रणजित कांबळे यांनी माजी आमदार सुरेश देशमुख यांचेशी युती करुन सभापती पदाच्या निवडीवेळी दगाफटका केल्याने सहकार नेते सुरेश देशमुख यांना सभापती पदावर पाणी पेरावे लागले, याचाच वचपा सहकार क्षेत्रातील इतर संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आमदार रणजित कांबळे यांना पराभूत करुन त्यांची जागा दाखविण्याची तयारी सहकार क्षेत्रातील नेत्यांनी आज खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १४ संचालकांच्या उमेदवारी करिता उमेदवारच मिळू दिले नाही, जे तीन उमेदवार आमदार रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक लढले, त्यांना पराभवाची धूळ चारली. समीर देशमुख यांचा सक्रिय सहभाग या निवडणुकीत पाहायला मिळाला असून ते सकाळी मतदाना पासून ते मतमोजणी पर्यंत उपस्थित होते. आज पार पडलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अखेर सुरेश देशमुख यांचे वर्चस्व कायम असल्याचे घोषित झालेल्या निकालावरुन सिद्ध झाले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे