Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक… चक्क बापानेचं तोडला मुलाचा लचका ; पिंपळगाव येथील घटनेने खळबळ

2 6 6 6 5 1

सचिन धानकुटे

सेलू : – किरकोळ कारणातून मुलगा आणि वडिलांत शाब्दिक वाद झाला. दरम्यान प्रकरण हातघाईवर आले आणि बापाने चक्क मुलाचा लचका तोडत त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंपळगाव येथे सोमवारी घडली. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीहून दहेगांव पोलीस ठाण्यात बापा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   प्राप्त माहितीनुसार, पिंपळगाव येथील अक्षय पुंडलिक बावणे(वय२१) हा गवंडी काम करतो. त्याने आपल्या वडिलांच्या नावाने एक होंडा शाईन मोटारसायकल खरेदी केली होती, परंतु त्या मोटारसायकलच्या इस्टालमेंट मात्र अक्षयनेच भरल्या आहेत. ती मोटारसायकल अक्षयसह त्याचे वडील पुंडलिक नानाजी बावणे असे दोघेही मिळून वापरायचे. रविवार ता.२० रोजी सायंकाळच्या सुमारास वडिलांना चानकी येथे न्हाव्याकडे जायचे असल्याने त्यांनी अक्षयकडे मोटारसायकल मागितली. परंतु अक्षयने ती त्यांना दिली नाही, म्हणून वडिलांनी त्याला शिवीगाळ देखील केली होती. 

   वडिलांनी सोमवार ता.२१ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास परत याच विषयावर अक्षयशी वाद घातला आणि शिवीगाळ देखील केली. दरम्यान अक्षयने वडिलांना याविषयी जाब विचारला असता, त्यांनी झालेल्या झटापटीत अक्षयच्या पोटावर जबरदस्त चावा घेतला. यात त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली. दरम्यान अक्षयने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात अक्षयच्या तक्रारीहून दहेगांव पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे