क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त घोराडच्या केजाजी कॉन्व्हेंटमध्ये विविध कार्यक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – घोराड येथील श्री संत केजाजी कॉन्व्हेंटमध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्थाचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करीत अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल तसेच जीवन चरित्रावर सविस्तर माहिती देण्यात आली. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा तर पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले यांची वेशभूषा साकारत सगळ्यांचे ध्यानाकर्षण केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षिका विद्या वांढरे, सुवर्णा पिसे, शिवानी राऊत, आरती भुरे आदिंनी परिश्रम घेतले.