माहेर शांती निवासात दंत व आरोग्य तपासणी शिबीर ; डॉ पाटील दाताचा दवाखान्याचा वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

सचिन धानकुटे
सेलू : – माहेर शांती निवासातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी दंत तथा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथील डॉ पाटील दाताचा दवाखानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सदर स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील विकास चौकात डॉ रजत पाटील यांचा दातांचा दवाखाना आहे. सदर दवाखान्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ रजत पाटील यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. स्थानिक माहेर शांती निवासातील रहिवाशांसाठी आरोग्य तपासणी व दंत चिकित्सा उपक्रम राबविण्यात आला. यासोबतच परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आली आणि शालेय वस्तूंची देखील मदत करण्यात आली. यावेळी माहेर मधल्या ४० जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी आरोग्य तपासणी डॉ प्रवीण कापसे यांनी तर दातांची तपासणी डॉ रजत पाटील, डॉ प्रिती शर्मा यांनी केली.
यशस्वीतेसाठी सिद्धार्थ पाटील, रेखा पाटील, मयुरी पाटील, मोनिका पिंपळे तथा माहेर शांती निवास येथील कर्मचारी शुभम झामरे, माया शेळके, प्रकल्प प्रमुख अतूल शेळके, रोशनी समर्थ आदिंनी सहकार्य केले.