वर्धेत 5 तरुणांच्या टोळीचा धुमाकूळ : केली मारपीट, लूटमार
विलास मून
वर्धा : कारला चौक भागात उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाला व क्लीनरला लुटण्याचा प्रयत्न,ट्रक पळविल्यावर दगडफेक हा ट्रक मुख्यमार्गाने शहरात आला गणपती मंदिर जवळ थांबला आहे. ही घटना मध्यरात्री घडली.
तिसरी घटना नागपूर मार्गावर
याच पाच तरुणांच्या टोळीने नागपूर मार्गावर एका दुचाकी चालकाला मारहाण केली आहे .सर्व घटनांची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता पासून पोलिसांच्या चमू आरोपींच्या शोधात निघाल्या आहेत.
कुलधरिया यांची मृत्यूशी झुंज
विजय कुलधरिया पहाटे 3 वाजता गणेश मंदिर समोर नमष्कार करीत असताना 5 तरुणांच्या टोळीने पैशाची मागणी केली. अमानुष मारहाण करून जखमी केले.पळाले पडले तेव्हा पुन्हा मारले.
घटना सीसीटीव्हीत कैद
कुलधरीया यांना नागपूर येथील सिमस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्याला व शरीराच्या इतर भागावर गंभीर स्वरूपाचा मार आहे.