महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त “शैलजा दराडे” गजाआड ; नोकरीच्या नावाखाली अनेकांना घातला लाखो रुपयांचा गंडा
आरएनएन न्युज Exclusive
पुणे : – नोकरीच्या आमिषाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शैलजा दराडे या शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना २०१९ साली त्यांनी राज्यातील ४५ शिक्षकांकडून प्रत्येकी १२ लाख ते १४ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
त्यांच्यासह त्यांच्या भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. डी एड झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी १२ लाख तर बी एड झालेल्या शिक्षकांकडून १४ लाख रुपये शैलजा दराडे ह्या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांच्यामार्फत घेत होत्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शिक्षक पोपट सूर्यवंशी यांनी याबाबत पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.