Breaking
ब्रेकिंग

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार “आक्केवार” गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

वर्धा : – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास गजाआड करीत वर्धा जिल्ह्यातील दोन व यवतमाळ जिल्ह्यातील दोन असे चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. प्रविण विनायक आक्केवार(वय५५) रा. एकुरी वार्ड, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

      शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्ती दरम्यान शहरात एक इसम संशयास्पद स्थितीत फीरताना आढळला. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात एक लोखंडी टॉमी, दागिने आणि शिक्के, २३ प्रकारच्या वेगवेगळ्या चाव्या, दोन फोन व रोख रक्कम असा एकूण २२ हजार ४२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासंदर्भात पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने एक महिन्याआधी सावंगी(मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील चोरी केल्याचे सांगितले. रामनगर व सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही गुन्ह्याच्या प्रकरणात त्याला आज पहाटे १ वाजून २६ मिनीटानी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर आरोपी हा घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार असून जिल्ह्यातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्याच्यावर याआधीही बऱ्याच चोरी व घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद आहे. यासोबतच त्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील दोन गुन्हे केल्याचे पोलिसांना तपासा दरम्यान सांगितले.

     ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपूरे, रितेश शर्मा, गोपाल बावणकर आदि कर्मचाऱ्यांनी केली.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे