ब्रेकिंग
लम्पी आजाराने बाधित बैलाचा उपचारादरम्यान मृत्यू ; ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात

1
2
7
1
1
9
सचिन धानकुटे
सेलू : – लम्पी आजाराने बाधित बैलाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घोराड येथे घडली. ऐन हंगामाच्या तोंडावरचं बैल दगावल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.
घोराड येथील पांडुरंग रामकृष्ण फटिंग ह्या शेतकऱ्याचा एक बैल गेल्या दोन महिन्यांपासून लम्पी आजाराने ग्रस्त होता. सेलू येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. परंतु आज रविवारी सकाळी दहा वाजता त्या बैलाचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ऐन हंगामाच्या तोंडावरचं बैल दगावल्याने शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्या बैलाच्या उपचारासाठी जवळपास ३५ ते ४० हजारांचा खर्च झाला असून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
1
2
7
1
1
9