एएनएमच्या निकालात डीपी नर्सिंग इन्स्टिट्यूटने मारली बाजी, शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
सेलू : – येथील डीपी नर्सिंगच्या विद्यार्थीनीनी नुकत्याच झालेल्या एएनएमच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
एएनएमच्या शैक्षणिक सत्र २०२२-२३ या प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये डीपी नर्सिंग कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अर्पिता कोरडे हिने ८३.३० टक्के गुण प्राप्त करीत प्रथम, आरती कुंभरे हिने ८२.५० टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय तर मयुरी साखरकर हिने ८१.८० टक्के गुण मिळवून तीसरा क्रमांक पटकावला. यावेळी संस्थेचे सगळेच विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत झळकले हे विशेष..
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.