Breaking
ब्रेकिंग

आमदार डॉ पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त सेलूत शुक्रवारी आरोग्य शिबीर

2 6 6 6 4 1

सचिन धानकुटे

सेलू : – आमदार डॉ पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

     सदर आरोग्य शिबिरात रक्तगट, सिकलसेल, क्षयरोग, कुष्ठरोग, बी पी शुगर तसेच सगळ्या प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात येणार आहे. यासोबतच आयुष्यमान भारत कार्ड वितरण, निराधार योजनेच्या लाभासाठी ह्यात प्रमाणपत्र व लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र देखील वाटप केले जाणार आहेत. शहरातील बसस्थानक परिसरात सकाळी दहा वाजता या आरोग्य शिबिराला सुरुवात होईल. शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, शहराध्यक्ष ओमदेव सावरकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संकेत बारई, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रामेश्वर धर्मुळ, आयुष्यमान भारत योजनेचे संयोजक सतिश वैद्य, संजय अवचट, राजेश झाडे, गोलू कामिनकर, नरेश पाठक, विजय खोडे, प्रफुल्ल खोडे, राणा दिवटे, गुलाबराव राऊत आदि पदाधिकाऱ्यांनी केले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे