Breaking
ब्रेकिंग

केदारनाथाच्या दर्शनानंतर परतणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ; गौरीकुंडा जवळील घटना

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

सेलू : – चारधामपैकी एक असलेल्या केदारनाथच्या दर्शनानंतर परतणाऱ्या सेलूच्या सेवानिवृत्त शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तेथीलच गौरीकुंडाजवळ घडली. कृष्णाजी परसराम माहुरे(वय६७) रा. सेलू असे त्या सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथील भाविकांचा एक जत्था केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसाठी मंगळवार ता.४ रोजी रात्री आठ वाजता रेल्वेने निघाला होता. यामध्ये नगरसेवक रुखसार पठाण यांच्यासह १६ जणांचा समावेश होता. सगळ्यांनी काल शुक्रवारी केदारनाथाचे दर्शन घेतले आणि सायंकाळच्या सुमारास गौरीकुंडाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान गौरीकुंड परिसरात रात्री सात वाजताच्या सुमारास यातीलच कृष्णाजी माहुरे यांची तब्येत अचानक बिघडली. ते घोड्यावर बसून असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते घोड्यावरचं निपचित पडले. त्यांना सहकाऱ्यांनी तत्काळ तेथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी देखील सोबतच होत्या.

    ते स्थानिक दिपचंद चौधरी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक होते. यासोबतच भाजपचे सक्रीय सदस्य देखील होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व मुलगा असा आप्तपरिवार आहे. मुलगा पंकज हा पुणे येथे डॉक्टर असून त्याला माहिती मिळताच तो रात्री बारा वाजता घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाला. त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे उद्या दुपारपर्यंत सेलू येथे येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता शहरात धडकताच परिसरात शोककळा पसरली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे