शाब्बास… वर्धा पोलिस…. वाळू माफियांवर मोठी कारवाई : करोडो रुपयांचा दंड होण्याची शक्यता : अनधिकृत सर्रास दिवस-रात्र सुरू होती वाळूची तस्करी : स्थानिक महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हे

किशोर कारंजेकर
वर्धा : वाळू उद्योगामुळे मुठभर लोक धनदांडगे झाले, पण यामुळे नद्या, किनारे आणि शेतकरी उदध्वस्त झाला आहे. यासाठी सरकारने वाळू लिलाव कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असताना वर्धा जिल्ह्यात मात्र वाळूचोर बिनधास्त वाळू चोरी करीत होते. मात्र वर्धा पोलिसांनी कारवाई करून स्थानिक महसूल प्रशासनाला जोरदार धक्का दिला.
जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी वाळू माफियांवरची कारवाई हिंगणघाट येथील कारडी भारडी घाटात करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता या वाळूघाटात एलसीबी वर्धा, वडनेर पोलीस व वन विभागाचा माध्यमातून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली… हे विषेश.
हिंगणघाट येथील स्थानिक महसूल विभागाला कुठलीही माहिती न देता गोपनीय पद्धतीने धाड टाकण्यात आली. वडनेर पोलीस स्टेशन परिसरामध्ये वाळू माफीयांचे टिप्पर, पोकलॅन व बोटची एकच गर्दी पहावयास मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून या दारोडा गावानजीक असलेल्या कारडी भार्डी घाटामध्ये अनिधिकृत वीनापरवाना वाळूची तस्करी केल्या जात होती. स्थानिक महसूल विभाग या एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू तस्करीवर कुठलीही कारवाई करत नसल्याने महसूल विभागावर प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात होते. वडनेर पोलिसात या प्रकरणात कारवाई सुरू असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री पर्यंत ही कारवाई चालणार आहे.
……………….
राजकीय दबावाची शक्यताही फोल ठरणार…
अधिकृतरित्या वाळूची तस्करी करणारे दबाव आणण्याची शक्यता असल्याने आता ही कारवाई पोलीस दबावाखाली कशा पद्धतीने करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय वर्ध्याचे पोलीस अधीक्षक कोणालाही सोडणार नाही, असा विश्वासही जनतेला आहे.