डॉ. अभ्यूदय मेघे यांचा मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश : देवळी मतदार संघात आजमावणार भाग्य : सूत्रांची माहिती
किशोर कारंजेकर
वर्धा : मागील सहा महिन्यांपासून जोरदार लोकसंपर्कात असलेले माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे डॉ. अभ्यूदय मेघे यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे वर्ध्याच्या राजकारनात खळबळ निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसचा दुपट्टा स्वीकारून हा प्रवेश पार पडला.
वर्धा आणि देवळी विधानसभा ही नेहमीच काँग्रेसच्या सोबत राहिली आहे. बीजेपीचा उमेदवार या वर्धा विधानसभेत दोनदा विजयी झाले असले तरी विजयाचे मताधिक्य फारच कमी राहिले आहे. शेखर शेंडे यांचा केवळ 7,933 मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसच्या पराभवाचे हेच कमी मताधिक्य पुढे ठेऊन अभ्यूदय मेघे यांनी हा काँग्रेस पक्षप्रवेश केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वर्धा विधानसभेत आजपर्यंत तेली विरुद्ध कुणबी उमेदवारांची लढत होत आली आहे. पण आता या पक्षप्रवेशाने उमेदवारीबाबत अनेक निकष लावले जाताना दिसताहेत.
पक्षप्रवेश झाल्यानंतर डॉ. अभ्यूदय मेघे यांना देवळी – पुलगाव मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी मागण्याची शक्यता आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवळी पुलगाव मतदार संघात रणजित कांबळे हे गेल्या पाच रेझीम आमदार आहेत. वर्धा किंवा देवळी या दोन क्षेत्रात दत्ता मेघे यांच्या आशीर्वादाने भाग्य आजमावण्याची शक्यता आहे.