अण्णाभाऊ साठे यांचे कार्य ऊर्जादाई – डॉ.अभ्युदय मेघे : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिपादन
सचिन धानकुटे
वर्धा : – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यामुळे आजच्या तरुणाईत एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारते. इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या व्यक्तीची कादंबरी अख्ख्या रशियापासून तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न या विशेष उपाधीने गौरविल्या जाते. साहित्य क्षेत्रात त्यांचं खूप मोठं कार्य असल्याचे प्रतिपादन डॉ अभ्युदय मेघे यांनी सिंदी मेघे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने केले.
याप्रसंगी अमित ठाकूर, सुमित गांजरे माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रमोद खंडारे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सिंदी मेघे स्थित पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या स्वागतानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश बावणे, विक्की बावणे, प्रविण पोटफोडे, गजू भेंडे, देवेंद्र भेंडे, यश भेंडे, मीना भेंडे, हिराबाई भेंडे, प्रवीण खडसे, दिलीप वानखेडे, वैशाली भेंडे, सारिका भेंडे, भाऊराव मुंगले, देवेंद्र डोके, मधुकर बावणे, सर्वोच्च ताकतोडे, शुभम डोके, दिनेश लोहकरे, शरद भगत, संजय मांडोळे, लालचंद चंदनखेडे आदिंचे सहकार्य लाभले.