ब्रेकिंग
काँग्रेसचे शेखर शेंडे यांची लोकसंपर्कात आघाडी : शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2
6
6
6
6
0
वर्धा : विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. त्याच गतीने उमेदवार आपला विजय कसा होईल याकरिता प्रयत्न करित आहेत. सध्या काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी लोकसंपर्कात आघाडी घेतली असून, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसेवा करण्यासाठी दररोज अनेक युवक शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत.
यातच 02/08/2024 रोजी कुणालदादा राऊत यांच्या आदेशानुसार व शेखर शेंडे यांच्या मार्गदर्शनात अंकुश मुंजेवार, विक्रम खडसे, प्रशांत वासनिक यांच्या सहकार्याने अनेक युवकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
प्रवेश घेणाऱ्यात ज्ञानेश्वर रामटेके, आशुतोष मारतोडे, मंगेश भजगवडी, आकाश शेंडे, सलमान शेख, आकाश इंगळे, सुरेश धावणे, राजू सोनटक्के, नितेश नखवे, प्रत्यूत पाटील, अमित वासनिक, अतिक शेख, बबलू शेख यांच्यासह अनेक युवकांचा सहभाग आहे.
2
6
6
6
6
0