Breaking
ब्रेकिंग

सार्वजनिक जागेत अनधिकृत रोहित्राची उभारणी..! महावितरणचा आमदारांच्या अट्टाहासापायी अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या जिवीताशी खेळ, भाजपच्या नगरसेविकांचा आंदोलनाचा इशारा

2 6 6 6 6 0

सचिन धानकुटे

सेलू : – स्थानिक नगरपंचायतच्या हद्दीतील सार्वजनिक जागेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे रोहित्राची उभारणी केली. याठिकाणी एक नाही तर तीन तीन अंगणवाड्या असून त्यात शेकडो विद्यार्थी आहेत. “त्या” अनधिकृत रोहित्रामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, परिणामी महावितरणच्या या दडपशाही विरोधात भाजपच्या नगरसेविकांनीच दंड थोपटले असून प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला.

    महावितरणच्या अडाणचोट अधिकाऱ्यांनी आमदार डॉ पंकज भोयर यांच्या दबावाखाली शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रभाग क्रमांक बारातील रोहित्र बसविण्याचा घाट घातला. सदर जागा ओपन स्पेस असून याठिकाणी तीन अंगणवाड्या आहे. यात जवळपास दिडशे विद्यार्थी आहेत. त्या धोकादायक रोहित्रामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता भाजपच्या स्थानिक नगरसेविका वेणूताई शंकरराव राऊत, अनिता चुडामण हांडे, मनिषा मंगेश भलावी, माजी उपनगराध्यक्ष चुडामण हांडे, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार डॉ पंकज भोयर यांनी कमीशनच्या चक्करमध्ये अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या जिवीताशी खेळ मांडल्याचा आरोप केला.

    सदर जागा ही नगरपंचायतच्या हद्दीतील असल्याने याकरिता महावितरणच्या अडाणचोट अधिकाऱ्यांनी नगरपंचायतची कोणतीही परवानगी घेतली नाही हे विशेष..! महावितरणकडून नगरपंचायतला साधी जागेची मागणी सुद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त रोहित्र स्थलांतरित करण्याचा ठराव ता.३० जुलै रोजी घेण्यात आला. तशा आशयाचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, जिल्हा नियोजन समितीकडे भाजप नगरसेविकांच्या तक्रारीहून नगराध्यक्ष महोदयांनी केला. 

     त्यानंतरही महावितरणच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांनी बुधवार ता.७ रोजी पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त रोहित्र उभारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष चुडामण हांडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना रॉकेल टाकून पेटवून टाकीन, असा इशारा देताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रोहित्र सोडून धूम ठोकली. नगरपंचायतच्या हद्दीत विनापरवानगी अतिक्रमण करु पाहणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर वादग्रस्त रोहित्र तत्काळ स्थलांतरित न केल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी भाजपच्या तीनही नगरसेविका तसेच माजी उपनगराध्यक्ष चुडामण हांडे यांनी यावेळी दिला. त्यामुळे याप्रकरणी महावितरणचे अधिकारी आता काय निर्णय घेतात, याकडे प्रभागातील नागरिकांसह सेलू वासियांचे लक्ष लागले आहे.

 

*विद्यार्थ्यांच्या जिवीताशी खेळ*

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी रोहित्र बसविण्याचा घाट घातला, त्याठिकाणी अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या खेळण्यासाठीचे मैदान आहे. येथे घसरगुंडी, झुले आणि फिरतं चक्र असल्याने सातत्याने विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे अशा ठिकाणी रोहित्र बसवून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अक्कलेचं दिवाळं तर काढलं नाही ना..! अशी शंका यानिमित्ताने नागरिकांतून उपस्थित होते.

 

भाजप विरुद्ध भाजप सामना

  याप्रसंगी सेलूच्या राजकारणात भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचे दिसून येते. यात वादग्रस्त रोहित्र भाजपच्या एका नगरसेवकाच्या प्रभागातून दुसऱ्या नगरसेवकाच्या प्रभागात स्थलांतरित करण्यासाठी महावितरणचा मात्र पार गोंधळ उडाला आहे. नियम धाब्यावर बसवून रोहित्र स्थलांतरित करण्याचा घाट घातला गेला. परंतु भाजपच्याच नगरसेवकांनी तो हाणून पाडण्यासाठी कंबर कसल्याने शहरातील नागरिकांना भाजप विरुद्ध भाजप असा रंगतदार सामन्याची मेजवानी येत्या काळात मिळणार, यात शंका नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे