Breaking
ब्रेकिंग

निराधार, श्रावण बाळ योजनेच्या शासनाच्या प्रमाणपत्रावर भाजप आमदार कुणावर यांनी स्वमर्जीने लावले स्वतःचे फोटो : प्रसिद्धीसाठी हपापलेल्या आमदाराकडून केली जातेय जनतेची दिशाभूल : शिवसेना उ.भा.ठाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आमदारावर कारवाई करण्याची मागणी

2 6 6 6 6 0

किशोर कारंजेकर 

वर्धा / हिंगणघाट : तहसीलदार, समुद्रपूर यांनी शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ मंजुरीच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांचे प्रमाणपत्र १९ ऑगस्टच्या झालेल्या तहसीलदार यांच्या समितीच्या सभेत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना वितरित करणाऱ्या प्रमाणपत्रावरील या योजनेचे अध्यक्ष आमदार समीर कुणावार यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. त्यावर शासनाचा लोगो व राजमुद्रा प्रकाशित करण्यात आली आहे. या प्रमाणपत्रावरील प्रकाशित केलेले छायाचित्र हे कुठल्या नियमात बसते, असा प्रश्न करीत उपविभागीय कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे हिंगणघाट येथील इमारत बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने मिळणारा किचन सेट व सुरक्षा पेटी मिळत असताना त्या ठिकाणी सुद्धा आमदार समीर कुणावर यांनी स्वतःचे फोटो व स्वतःच्या नावाचे स्टिकर व टोकनवर त्यांचा फोटो असलेले टोकन वितरित करण्यात आले. ते सुद्धा नियमात बसत नसता नाही प्रशासनाने या संदर्भात आजच्या तारखेपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. वरील सर्व विषय जर नियमात बसत असेल तर, आमची व आमच्या पक्षाची कुठलीही हरकत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम कामगार गोरगरीब व गरजू लोकांच्या उत्थानाकरिता अशा योजना निर्माण केल्या. परंतु या योजनेला लोकांपर्यंत पोचविण्याचे काम शासनाचे असताना, परंतु शासन मात्र यात कुठेही दिसत नाही. स्थानिक आमदार समीर कुणावार हे आपल्या पद्धतीने प्रशासनावर दबाव टाकून या योजनेचा लाभ स्वतःला मतदानातून कसा होईल यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असताना. या कृत्याबाबत आपल्याकडून (प्रशासन) कुठली कारवाई केलेली दिसून आली नाही आणि म्हणून या संदर्भात आपल्या कडून लेखी स्वरुपात शासनाचे म्हणे आम्हास कळवावे अशी मागणी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रतेच्या नुसार एखादा लोकप्रतिनिधीला शासनाचे नियम पाळत येत नसेल किंवा त्यांना कळत नसेल तर, आम्ही समजू शकतो. परंतु आपल्या विभागातील सर्व अधिकारी, शासकीय परीक्षा उत्तीर्ण करून असल्यावर सुद्धा त्यांच्या सदर विषय लक्षात का आला नाही ? म्हणून आमची आपणास विनंती आहे की, संबंधित विषयावर आपण कोणती कार्यवाही करणार ? याबद्दल सविस्तर लेखी माहिती देखील मागण्यात आली आहे. या प्रकरणात कुठलीही कारवाई न केली गेली असल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी घुसे, तालुका प्रमुख सतीश धोबे, मनीष देवडे, सितारामजी भुते उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाणे , मनोज वरघणे, शंकर मोहमारे, गजानन काटवले ,भास्कर ठवरे, अनंता गलांडे ,आशिष जयस्वाल ,चंदू भुते ,प्रशांत सुपारे,नितीन वैद्य, दिलीप वैद्य, फिरोज खान, फारुख खान, पप्पू घवघवे ,अमोल वादाफळे ,आशिष वाघ, शंकर भोंमले,दिनेश धोबे, संजय सोनुरकर, नथुजी कुकडे, आकाश सुरकार ,गणेश ढेकले,इत्यादी शिवसैनिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले

निवेदनामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर शासकीय अधिकाऱ्याची कुठलीही स्वाक्षरी नाही, आमच्या कार्यालयाच्या वतीने ते प्रमाणपत्र देण्यात देखील आलेले नाही.. आमदार समीर कुणावर यांचा फोटो असलेले प्रमाणपत्र त्यांनी आपल्या स्तरावर वाटले असावे.. ते शासनाचे प्रमाणपत्र नाही. शासनाच्या योजनेचे वेगळे प्रमाणपत्र असतात. निवेदन वरिष्ठांना पाठवली असून वरिष्ठ या संदर्भात निर्णय घेतील.

वंदना सौरंगपते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे