Breaking
ब्रेकिंग

वीज पडल्याने कोटंबा येथील शेतकऱ्याचा मॄत्यू, मोबाईलवर बोलताना घडली घटना

2 6 9 2 0 0

सचिन धानकुटे

सेलू : – मौजा कोटंबा शेतशिवारात वीज पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मॄत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मोरेश्वर देविदास वांदिले (वय४५) असे मॄतक शेतकऱ्याचे नाव आहे.

      मॄतक शेतकऱ्याची मौजा कोटंबा शेतशिवारात शेती आहे. ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी शेतातील झाडाखाली मोबाईलवर बोलत असताना मोरेश्वर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते यात भाजले गेले आणी त्यांचा घटनास्थळीच मॄत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी यासंदर्भात प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मॄतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मॄतक मोरेश्वर हे स्थानिक ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते. त्यांच्यामागे पत्नी, आई, वडील, मुलगा आणि मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अशा अकाली निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

4.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 2 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे