सॉफ्ट टेनिस जिल्हा संघाच्या कर्णधार पदी सागर राऊत आणि गौरी जोशी ; जळगांव येथे होणार सिनीयर अजिंक्यपद स्पर्धा
सचिन धानकुटे
सेलू : – सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी मुलांच्या वर्धा जिल्हा संघाच्या कर्णधार पदी सागर राऊत तर मुलींच्या संघासाठी गौरी जोशी हिची निवड करण्यात आली. जळगांव येथे १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत सॉफ्ट टेनिस सिनीयर अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.
वर्धा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने नुकताच वर्धा जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे सचिव अनंत भाकरे यांनी मुलांच्या संघासाठी सागर राऊत तर मुलींच्या संघासाठी गौरी जोशी हिची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. जळगांव येथे १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलांच्या संघात सागर राऊत, तोहीर शेख, अथर्व अंभोरे, सक्षम काटवे, मोहित देवतारे, अनुज देवतारे, विवेक खराबे, सोहम भांडेकर तर मुलींच्या संघात गौरी जोशी, आदिती लामसोंगे, अनुष्का डोळसकर, भार्गवी मेघे, देवश्री राऊत, यशस्वी राठोड, याचिका थेटे, अक्षरा नखाते यांचा समावेश आहे. मुलींच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून भारती तिमांडे आणि व्यवस्थापक म्हणून रोशनी काटवे तर मुलांच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून निसार सय्यद आणि व्यवस्थापक म्हणून साक्षी धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंचे वर्धा सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आणि त्यांना जळगांव येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.