Breaking
ब्रेकिंग

पत्रकारांचे प्रश्न विधिमंडळात लावून धरणार..! सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपोषण मंडपाला भेट देत ग्वाही

राज्यातील अनेक आमदारांच्या उपोषण मंडपाला भेटी, दुसरा दिवस कमालीचा उत्साही, राज्यातील अनेक पत्रकारांचा आंदोलनात सहभाग

1 9 7 0 6 4

सचिन धानकुटे

वर्धा : – जो दुसऱ्यांचे प्रश्न मांडतो, “त्या'” पत्रकारांच्या प्रश्नाला वाचा फुटायलाचं हवी, आम्ही तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आणि विधिमंडळात पत्रकारांचा आवाज बुलंद करू, असे आश्वासन आज सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह विविध मतदारसंघातील आमदारांनी दिले. गुरुवारी आंदोलनाचा दुसरा दिवस कमालीचा उत्साही होता.

संपूर्ण राज्यभरातील अनेक पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाने हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपुरात पुकारलेल्या लाक्षणिक उपोषण मंडपाला आज गुरुवारी विविध मतदारसंघातील आमदारांनी भेटी दिल्यात. याप्रसंगी गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, परभणीचे राहुल पाटील, शहाद्याचे राजेश पडवी, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर आदी आमदारांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली. या सर्व लोकप्रतिनिधींना व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेला सकारात्मक दाद देत पत्रकारांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी यावेळी दिले. केंद्र सरकारकडे सुद्धा हे प्रश्न मांडण्याचे आश्वासन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी दिले. दैनिक पुण्यनगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, कवी लोकनाथ यशवंत यांनीही आज मंडपाला भेट देत “व्हॉईस ऑफ मिडीया”च्या उपोषणाला पाठिंबा दिला. 

 

पटोले, वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यांनीही दिला विश्वास

 

व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विधिमंडळातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा केली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत पत्रकारांच्या मागण्या लावून धरण्याचे आश्वासन यावेळी दिले.

 

पत्रकारांचा उत्साह आणि घोषणांनी अख्खे यशवंत स्टेडियम दणाणले

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांचा उत्साह दांडगा होता. आपल्याला आपले हक्क मिळावेत, यासाठी आज सर्व पत्रकारांनी घोषणा दिल्यात. यावेळी अख्खे यशवंत स्टेडियम दणाणले होते. त्यामुळे साहजिकच पत्रकारांच्या अनोख्या आंदोलनाकडे सगळ्यांचेचं लक्ष केंद्रित झाले.

 

वर्धा जिल्ह्यातील पत्रकारांचाही लाक्षणिक उपोषणात सहभाग

   विधीमंडळ अधिवेशना दरम्यान सुरू असलेल्या पत्रकारांच्या लाक्षणिक उपोषणात वर्धा जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झालेत. यात व्हॉईस ऑफ मिडीयाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाशजी कथले, विदर्भ उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, सचिव एकनाथ चौधरी, खजिनदार सचिन पोफळी, सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे, देवळी तालुका अध्यक्ष गणेश शेंडे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष इकबाल पहेलवान, रमेश लोंढे, संजय धोंगडे, मंगेश काळे, आशिष धापूडकर, किरण राऊत, अरविंद गजभिये, विनोद पोकळे, सोमेश ठाकरे, विलास मून, आशिष इझनकर, अरुण गावंडे, दिनेश घोडमारे आदि पत्रकारांचा समावेश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे