Breaking
ब्रेकिंग

वर्धा नगरपालिकेचे धिंडवडे रस्त्यावर : अमृतच्या खड्डयात साठवली दुचाकी; दुचाकीस्वार गंभीर जखमी ; हॉटेल रामकृष्ण समोरील घटना

2 6 6 6 6 0

सचिन धानकुटे

वर्धा : – शहरातील अमृत योजनेच्या खड्डयात काल रात्री एक दुचाकीस्वार आपल्या दुचाकीसह पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यामुळे शहरातील शहरवासीयांसाठी नगरपरिषदने राबवलेली अमृत गटार योजना चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. सदर घटनेमुळे वर्धेकर रात्री उशिरापर्यंत संतप्त होत रस्त्यावर उतरले होते. शेवटी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.

येथील नगरपरिषदेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामांमुळे शहरातील रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. शहरातील रामकृष्ण हॉटेलसमोर याच योजने अंतर्गत विस फुटांचा खोल खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. काल शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास याच खड्डयात एक दुचाकीस्वार आपल्या दुचाकीसह साठवला. रस्त्याच्या अगदी मधोमध असलेल्या या खड्डयाचा सदर दुचाकी चालकाला अंदाजच आला नाही. त्यामुळे तो खड्डयात पडून गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याविषयी शहरात माहिती पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी नगरपरिषदेच्या कारभारावर चांगलाच संताप व्यक्त केला. शेवटी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती निवळली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे