Breaking
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचर ठरतेय तकलादू : कोट्यवधींच्या फर्निचरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : टेंडर प्रक्रियादेखील वादग्रस्त

2 2 5 4 5 3

किशोर कारंजेकर

वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाची करोडो रुपयाची इमारत उभी झाली खरी पण या इमारतीमध्ये कामकाज केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात होता. उदघाटन झाल्यावर तब्बल एक वर्षानंतर या इमारतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय शिफ्ट झाले आहे. फर्निचरचे काम व्हायचे असल्याने येथे अद्याप कार्यालय शिफ्ट झाले नसल्याची सबब प्रशासनाकडून सांगितली जात होती. पण नेमके फर्निचरचे घोडे कुठे पेंड खात होते? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नव्हते. अखेर फर्निचरच्या टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्या आणि आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला टेंडर कसे मिळेल याची काळजी देखील घेण्यात आली. यात नेत्यांची मर्जी राखत टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पार पडली. फर्निचर देखील लागले पण हे फर्निचरच आता तकलादू असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात आहे.

खुर्च्या तर अत्यंत दर्जाहीन असल्याची बाब खुर्चीवर बसताच लक्षात येते. तर लाखो रुपयांचे लावण्यात आलेले सोफे बोगस असल्याची ओरड सध्या होत आहे. सोफ्याचे फोमच अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 4 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे