वंचित बहुजन आघाडीकडून मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध
सेलू : – मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जालना येथे आंदोलनासाठी बसलेल्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करीत अमानुष मारहाण केली. सरकारच्या हुकूमशाही व दडपशाही कार्यवाहीचा आज वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या सेलूच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध व्यक्त केला.
सदर आंदोलनात वंचितचे वर्धा जिल्हा प्रभारी इंजि बंडुभाऊ नगराळे, पूर्व विदर्भ समन्वयक सदस्य किशोर खैरकार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष गुजर, महिला जिल्हाध्यक्ष मंगला कांबळे, माजी जिल्हा महासचिव सिद्धार्थ डोईफोडे, युवक आघाडी जिल्हा महासचिव प्रविण सुटे, जिल्हा सदस्य सोपान टेंभुर्णे, सेलू तालुका अध्यक्ष अरुण साखरकर, जिल्हा सचिव सुधाकर बेसेकर, सेलू शहर अध्यक्ष ताराचंद पोपटकर, तालुका उपाध्यक्ष शालीक भगत, प्रज्वल टेंभरे, बंडु चहांदे, दयाशंकर भगत, नंदकिशोर मेश्राम, निरुपाताई वासे, संध्या साखरकर, शोभा पोपटकर, इंदिरा बेसेकर, तारा टेंभुर्णे, नंदा थुल, ज्योत्स्ना टेंभुर्णे, बबन जामनकर, गौतम भगत, दिक्षा टेंभुर्णे, सिद्धार्थ जंगले, भानुदास मेश्राम, शंकर भाजीखाये, मंगेश ओंकार, विनोद शंभरकर, प्रवीण मेंढे, धनराज पाटील, प्रकाश साखरकर, धर्मराज मेंढे, रेखा साखरकर सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते व उपस्थित होते.