ब्रेकिंग
रेहकीच्या इसमाची गळफास घेत आत्महत्या
2
6
7
9
5
0
सेलू : – नजिकच्या रेहकी येथे इसमाने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गजानन विठोबा चाफले (वय४५) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक हा आपल्या मालवाहू वाहनातून दुध संकलनाचे काम करायचा. कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेल्याने तो रविवारी दुपारच्या सुमारास एकटाच घरी आराम करीत होता. अशातच त्याने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याची आई जेव्हा पहायला गेली, तेव्हा सदर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक स्वपनिल भोजगुडे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
2
6
7
9
5
0