Breaking
ब्रेकिंग

कारच्या धडकेत केळझरच्या दाम्पत्याचा मृत्यू

2 0 8 9 5 3

सचिन धानकुटे

सेलू : – भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार केळझर येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास वर्ध्याच्या प्रवेशद्वारासमोर घडली. अवधूत बापूराव वैरागडे(वय६४) व चित्रा अवधूत वैरागडे(वय५६) रा. केळझर असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळझर येथील सेवानिवृत्त शिक्षक अवधूत वैरागडे पत्नीसह आपल्या दुचाकीने वर्ध्याहून केळझरच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांनी शार्टकटच्या नादात आपली दुचाकी राँग साईडने टाकली. दरम्यान पवनारकडून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की, सेवानिवृत्त शिक्षक वैरागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या अर्धांगिनी चित्रा वैरागडे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान अपघातग्रस्त कार ही देखील अनियंत्रित झाल्याने थेट रस्ता दुभाजकावर जावून आदळली. सदर घटनेची माहिती मिळताच केळझर येथील माजी सरपंच फारुख शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर मेश्राम व सज्जाद शेख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. मृतक वैरागडे दाम्पत्याच्या मागे मुलगा, मुलगी व नातवंडे असा बराचमोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे केळझर येथे शोककळा पसरली आहे.

4/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे