Breaking
ब्रेकिंग

अभाविपचा गोल्डन पिक्स समर कॅम्प उत्साहात

1 9 7 0 7 2

सचिन धानकुटे

वर्धा : – विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून उन्हाळ्याच्या सुट्टीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नुकताच “द बिगीनिंग्स ऑफ गोल्डन पिक्स” समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. वर्ध्या नजिकच्या वसुंधरा ऍग्रो टुरिज्मस् वॉटर पार्क याठिकाणी शनिवार दि.२७ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सदर समर कॅम्प संपन्न झाला. 

   समारोपीय सत्रात अभाविपच्या विकासार्थ विद्यार्थी(एसएफडी) गतिविधीचे राष्ट्रीय सहसंयोजक मयूर जव्हेरी, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजेश लेहकपुरे, एसएफडीचे विदर्भ प्रदेश संयोजक निलय बोन्ते आदि मान्यवरांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी मयूर जव्हेरी व निलय बोन्ते यांनी पर्यावरणाच्या संतुलनाकरिता एसएफडीची भूमिका मांडत पर्यावरणाबद्दल आपल्या संवेदना मांडल्यात. यावेळी प्रा. लेहकपुरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांचे तीन गटात विभाजन करून विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सेल्फ इंट्रोडक्शन, मशाल सत्र, मूव्ही नाईट, खजिना शोध, प्रातः भ्रमण, ट्रेकिंग, प्रश्नोत्तरी, मनोरंजन सत्र, मेडिटेशन, अनुभव कथन तसेच भारतीय इतिहास व भारतीय संस्कृती आदि विषयांवर चर्चासत्र सुद्धा आयोजित केले होते. अनुभव कथन सत्रात विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादावर प्रतिक्रिया देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भविष्यात पुन्हा अशाच प्रकारे समर कॅम्पचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन यावेळी शिबीर संयोजक यश दौड यांनी दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे