राष्ट्रवादीत तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच ; डझनभर नेत्यांच्या नावाची चर्चा
सचिन धानकुटे
सेलू : – येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. याकरिता तालुक्यातील डझनभर नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे आज पार पडलेल्या बैठकीत दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलू तालुका अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडे अख्ख्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज गुरुवारला “एक तास राष्ट्रवादीसाठी” या मिशन अंतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख यांच्या मार्गदर्शनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यासोबतच निष्क्रिय तथा पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षानेच वाळीत टाकलेल्या माजी तालुकाध्यक्षांच्या जागी नव्याने अध्यक्ष निवडण्यावर खुली चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलू तालुकाध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. यात जवळपास डझनभर नेत्यांच्या नावाला झालेल्या चर्चेदरम्यान पसंती दर्शविण्यात आली.
यात प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गुणवंत कडू, शाम पाटील वानखेडे, शहराध्यक्ष हनिफभाई सय्यद, हरीभाऊ झाडे, दिलीप गावंडे, अर्चित निघडे,
घनश्याम डाखोळे, योगेश जाधव, दिलीप ठाकूर आदिंची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बबनराव हिंगणेकर तर युवा नेते समीर देशमुख, सभापती केशरीचंद खंगार, विधानसभा प्रमुख मिलिंद हिवलेकर, शहराध्यक्ष हनिफभाई सय्यद यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीला बाजार समितीचे संचालक धनराज गिरी, गुणवंत कडू, अनिल जिकार, संजय काकडे, परेश देशमुख, तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष दिलीप गावंडे, संचालक प्रविण पाटील, नरेश सायरे, महाविर तिवारी सह नारायण मसराम, दिलीप घोंगडे, घनश्याम डाखोळे, पुरुषोत्तम कावलकर, डॉ खैरकार, दिलीप ठाकूर, योगेश जाधव, नरेश खोडके, अर्चित निघडे, रोशन राऊत, खोबे, अतुल कोटंबकार, सिंदी शहर उपाध्यक्ष मोहनराव अंभोरे सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संचालन शाम पाटील वानखेडे यांनी तर आभार सतिश तेलरांधे यांनी मानले.