Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक : “त्या” बसचा चालक दारुच्या नशेत असल्यानेचं अपघात ; फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक वास्तव उजेडात

2 2 5 4 7 5

किशोर कारंजेकर

वर्धा : – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचालका संदर्भात धक्कादायक अहवाल समोर आला आहे. सदर अपघातावेळी चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं धक्कादायक वास्तव फॉरेन्सिक अहवालात समोर आलं आहे. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, ही माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे.

   समृद्धी महामार्गावर ता.१ जुलै रोजी खाजगी बसचा भीषण अपघात झाला. यातील बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल नुकताच समोर आला आहे. या अहवालात चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं आहे. अमरावतीच्या रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी(RFSL) रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा जास्त होते.

अमरावती मधील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या अहवालाप्रमाणे, ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण १०० मिलिलीटर रक्तात ३० मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे. मात्र, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे ता.१ जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे, तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.

  रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या माहितीनुसार, २३ मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून अद्याप दोन मृतदेहांचे अहवाल प्रलंबित आहेत. डिझेलमुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली. त्यामुळे २५ प्रवाशांना बचावण्याची संधीच मिळाली नाही. फॉरेन्सिक अहवालात टायर फुटल्यामुळे अपघात झाला का, याची शक्यताही तपासण्यात आली. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुने देखील तपासण्यात आले. परंतु, निष्कर्षावरून ही शक्यता फेटाळण्यात आली.

  दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या “त्या” बसचा अपघात ३० जून आणि १ जुलैच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास झाला होता. फॉरेन्सिक टीमने बस ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्ताचे सॅम्पल १ जुलैला दुपारच्या सुमारास घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झालं असावं असे तज्ज्ञांना वाटतं. म्हणजेच अपघात घडला त्यावेळेस ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण अहवालात नमूद करण्यात आलं, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता आहे.

   सदर अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस रस्ता दुभाजकावर आदळली. त्यानंतर बस रस्त्यावर आडवी होत घासत गेली आणि बसला आग लागून अपघात घडला. याप्रकरणी बसच्या चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 4 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे