ब्रेकिंग
रेहकीच्या इसमाची गळफास घेत आत्महत्या
2
6
7
9
5
4
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या रेहकी येथील इसमाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली. शंकर वासुदेव बजाईत(वय३२) असे मृतकाचे नाव आहे.
रेहकी येथील मृतक शंकर बजाईत हा रोजमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. काल रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यामागे पत्नी, दोन मुलं व वडील असा आप्तपरिवार आहे.
2
6
7
9
5
4