हिंगणघाटचे ठाणेदार रक्षक नव्हे भक्षक : ठाणेदार संपत चव्हाण यांच्यावर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल

किशोर कारंजेकर : वर्धा
हिंगणघाट पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून ठाणेदार संपत चव्हाण यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार हा धक्कादायक असून तेवढाच संतापजनक आहे.
24 वर्षीय पीडित ही आपल्या कुटुंबाविरुद्ध 5 ऑगस्ट 2021 पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता. त्यावेळी ठाणेदार संपत चव्हाण हे कर्तव्यावर होते. त्यावेळी तू माझ्याशी मैत्री करशील तरच ‘मी तुझी तक्रार घेईल’ असे पिडीतेला म्हटले. त्यानंतर ठाणेदार संपत चव्हाण हे पीडितेच्या घरी जाऊन शारीरिक संबंध ठेवले तरच तक्रार घेईल. पीडित युवती घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान त्यांनी एक व्हिडिओ काढून व्हिडिओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर वारंवार अत्याचार करत असायचा.
पीडितेने ठाणेदार यांच्या पत्नीला माहिती देण्यात आल्यावर पत्नीने युवतीला फसवण्याची धमकी दिल्याची तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीने जवळपास पाच पानामध्ये आपला बयान नोंदविला असल्याचे तक्रार मध्ये दिसत आहे. 6 मार्च रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात ठाणेदार संपत चव्हाण यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांनी 376 (2) अ, 376 (1), 376 (2)(n) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदारांने पीडितेवर असाही केला छळ…
ठाणेदार संपत चव्हाण यांनी पीडित युवतीचे ठाणेदारकडे विणवनी करायची. माझी तक्रार आहे ती दाखल करा. तिच्याकडे कोणताही पर्याय विनवणी शिवाय उरला नव्हता. याचा गैरफायदा घेत ठाणेदार यांनी वर्दीचा गैरवापर करून पीडितेचा लैंगिक छळ, मानिसक त्रास, ब्लॅकमेल करत राहिला. त्यात पत्नीने पीडितेवर अन्याय केल्याचा आरोप पीडितेने पाच पानाच्या बयानात नोंद केला आहे.
तक्रारीनंतर ठाणेदारांची तडकाफडकी बदली ?
21 डिसेंबरला पीडितेने ठाणेदार चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसविरुद्ध तक्रार असल्याने ही तक्रार पोलीस अधीक्षकाकडे पाठविण्यात येईल, असे पीडितेला सांगण्यात आले होते. त्यानंतर ठाणेदार यांची बदली करून त्यांच्या जागेवर प्रभारी ठाणेदार कैलास फुंडकर यांना पदभार देण्यात आला होता. ठाणेदार संपत चव्हाण यांची वर्धा येथे तात्पुरती बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणेदार म्हणतात कारवाई प्रोसेसमध्ये : पण FIR कॉपी RNN च्या ताब्यात
हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार फुंडकर म्हणतात की कारवाई प्रोसेस मध्ये आहे असे सांगितले. मात्र पोलीस स्टेशन मधील ‘एफआयआर’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात खर कोण हे कळायला मार्ग नाही. ठाणेदार संपत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असल्याचा FIR कॉपी RNN च्या हाती लागली आहे.