संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर धर्मुळ
सचिन धानकुटे
सेलू : – संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची यापूर्वी गठीत करण्यात आलेली तालुकानिहाय समिती नुकतीच बरखास्त करुन सदर समितीचे नव्याने गठन करण्यात आले. त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सेलू तालुका अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामेश्वर बळीरामजी धर्मुळ यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशित केल्यानुसार अशासकीय सदस्यांना घेऊन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ता. ९ मार्च रोजी गठीत करण्यात आली. यात सेलू तालुक्यातील समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर धर्मुळ यांची तर सदस्य पदावर धानोली येथील जयश्री कृष्णा शंखदरबार, नरेश मन्नाप्रसाद पाठक, रोशन विलासराव वांदिले, सागर डोमाजी भगत, संकेत सुरेशराव बारई, चंद्रशेखर रामभाऊ शेंडे, संजय विठ्ठलराव अवचट, राजेश ज्ञानेश्वर झाडे, प्रविण सिर्सिकर यांच्यासह दोन शासकीय प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.