Breaking
ब्रेकिंग

शेतात वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, तीन गंभीर जखमी

2 6 9 0 7 6

सचिन धानकुटे

सेलू : – शेतात काम करताना अंगावर वीज पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारच्या सुमारास नजिकच्या जुवाडी येथे घडली. सदर दुर्घटनेत तीन शेतमजूर महिला गंभीर तर दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. मंदा प्रभाकर वाघमारे(वय५५) रा. जुवाडी असे मॄतक महिला शेतकऱ्याचे नाव आहे. यातील जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी स्थानिकांनी दिली.

  जुवाडी येथील शेतकरी प्रभाकर वाघमारे आपल्या सौभाग्यवतीसह पाच महिला शेतमजूर घेऊन आज गुरुवारी सकाळी शेतातील कामानिमित्त गेले होते. दरम्यान दुपारी चार वाजताच्या सुमारास जुवाडी परिसरातील शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सगळेच शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतात वीज कोसळली. यात मंदा प्रभाकर वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर अर्चना तुकाराम दाभेकर(वय३६), किरण लती वाल्हे(वय३०) आणि उर्मिला दिलीप कोल्हे(वय३२) तीनही रा. जुवाडी यांना वीजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्यात. दरम्यान दोन महिला मजूरांना देखील यावेळी किरकोळ इजा झाल्याचे सांगितले जाते. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

3.5/5 - (6 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 0 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे