महिला व मुलींच्यात भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज..! श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सेलू : – महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला आणि मुलींच्यावर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल् भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता असल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील बदलापूर येथील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शाळा महाविद्यालयात देखील मुलींच्यावर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची नितांत गरज आहे. याकरिता महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गृहविभागास निर्देश देत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकरिता सेलू येथील श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय कोपरकार, उपाध्यक्ष दिलीप पोहाणे, सेलू शहराध्यक्ष सुरज माहुरे, सिंदी रेल्वे शहर अध्यक्ष किशोर डकरे, उपाध्यक्ष गणेश घाटुर्ले सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.